पुणे-सातारा महामार्गावर खड्डे
By admin | Published: June 29, 2015 06:21 AM2015-06-29T06:21:25+5:302015-06-29T06:21:25+5:30
कापूरव्होळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावर खड्डे पडले आहेत.
कापूरव्होळ : कापूरव्होळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साठल्यामुळे ते चुकवण्याच्या नादात या ठिकाणी अपघात होत आहेत.
कापूरव्होळ चौकात नारायणपूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे वाहनांना यातून मार्ग काढावा लागत आहे. दूरवरून प्रवास करून कापूरव्होळ चौकात उतरणाऱ्या प्रवाशांना पाण्यात व पावसात थांबावे लागत आहे. चौकातील पाणी ओढ्याच्या बाजूला चर काढून काढणे आवश्यक आहे; अन्यथा पावसाळ्यात प्रवाशांना उभे रहाण्यासाठी जागाच शिल्लक रहाणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
पुणे-सातारा महामार्ग रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरू असून, कामाच्या ठिकाणी वाहतूक वळवण्यासाठी तयार केलेल्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनांना जागोजागी थांबत थांबत पुढे जावे लागत असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा सुरू आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी व चारचाकी तसेच अवजड वाहनांना अपघात होत आहेत.