खळदकर कुटुंबीयाने उभारला दशक्रिया विधी निवारा शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:11+5:302021-05-08T04:11:11+5:30

दौंड पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब भोसले, भीमा पाटसचे माजी संचालक राजकुमार मोटे यांनी ...

Khaldakar family erected Dashakriya ritual shelter shed | खळदकर कुटुंबीयाने उभारला दशक्रिया विधी निवारा शेड

खळदकर कुटुंबीयाने उभारला दशक्रिया विधी निवारा शेड

googlenewsNext

दौंड पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब भोसले, भीमा पाटसचे माजी संचालक राजकुमार मोटे यांनी आपल्या मनोगतातून डी. के. खळदकर यांच्या कार्याचा आढावा घेतला व आठवणी जागवल्या. याप्रसंगी कर्मयोगी कारखान्याचे संचालक महादेव जगताप, नानासाहेब फडके, सुभाष बोत्रे, लक्ष्मण दिवेकर, सोमनाथ ताकवणे, जयदीप सोडनवर, सुरेश सुदाम गोरखे, रमेश नांदखिले, काका खळदकर, रमेश बोत्रे, काळूराम बोत्रे, नानगावचे चंद्रकांत खळदकर, भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, विश्वास भोसले, उपसरपंच संदीप खळदकर, दशरथ खळदकर, जालिंदर काळे, सचिन शिंदे, विष्णू खराडे आदी उपस्थित होते.

डी. के. खळदकर यांच्या स्मरणार्थ वसुधा सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व खळदकर कुटुंबीयांच्या वतीने दहा कोविड सेंटरला पीपीइ किट, प्रोटेक्शन गाऊन, स्टेथसस्कोप, थर्मामीटर व सेंच्युरियन प्रूप साहित्य भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी पांडुरंग खळदकर, रवींद्र खळदकर, डॉ. भरत खळदकर, डॉ. विशाल खळदकर, मयूर खळदकर यांनी उपस्थितांचे ऋण मानले.

---

फोटो क्रमांक- ०७ केडगाव खळदकर

फोटो ओळी : नानगाव येथे कै. डी. के. खळदकर यांच्या स्मरणार्थ खळतकर कुटुंबीयांनी उभा केलेले दशक्रिया विधी निवारा शेड.

--

Web Title: Khaldakar family erected Dashakriya ritual shelter shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.