खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:04 PM2018-12-10T22:04:18+5:302018-12-10T22:05:27+5:30

दहशतवाद विरोधी पथक : युएपीएखाली कारवाई

The Khalistan confiscation of links between Pakistan, confessed to the accused arrested in Pune | खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली

खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली

पुणे : दहशतवादविरोधी पथकाने चाकण येथे पकडलेल्या खलिस्तानवाद्याविरोधात बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियमान्वये (युएपीए) कारवाई करण्यात आली आहे. खलिस्तान निर्मितीसाठी तो परदेशात तसेच पाकिस्तानमधील लोकांशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याच्या एका साथीदाराला पंजाब येथील सरहद् पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय ४२, रा़ बेल्लारी, कर्नाटक, मुळ मुगलमाजरा, पो़ सिहोनमाजरा, जि़ रोपड, पंजाब) असे त्याचे नाव आहे. दहशतवादविरोधी पथकाला २ डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाईक याला चाकण येथे सापळा रचून पकडण्यात आले होते. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व ५ काडतुसे आढळून आली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने अधिक तपासासाठी १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. 

या गुन्ह्याचा तपास करीत असताना नाईक हा अत्यंत प्रभावीपणे इंटरनेट व सोशल मिडिया वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा वापर तो शस्त्रास्त्र जमविणे, तसेच भारतात दहशतवादी कारवाया करण्याकरीता तरुणांना भडकावणे यासाठी करता वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. तो स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता आहे. स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या तयारीकरीता तो देशांतर्गत व पाकिस्तानसह परदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याला सोमवारी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तो व त्याच्या साथीदारांनी दहशतवाद्यांची टोळी बनवून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे मिळविले व दहशतवादी कृत्ये करण्याची तयारी केली. त्यांच्याविरुद्ध पुरावा उपलब्ध झाल्याने त्यांच्या बेकारदेशीर हालचाली प्रतिबंध अधिनियम (युएपीए) कलम लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत १७ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. 

Web Title: The Khalistan confiscation of links between Pakistan, confessed to the accused arrested in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.