खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 05:53 PM2024-09-05T17:53:11+5:302024-09-05T17:54:00+5:30

जेजुरी देवस्थानकडून मानपत्र प्रदान

Khandoba is the deity of the country's freedom fighters; Sarsangchalak Dr. Awarded by Mohan Bhagwat, Jejuri Devasthan | खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

जेजुरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजुरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  

सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानचे  प्रमूख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त राजेंद्र खेडेकर, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अॅड. विश्वास पानसे, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, विश्वस्त पोपट खोमणे, पदसिद्ध विश्वस्त  तहसिलदार विक्रम राजपूत, व्यवस्थापक आशिष बाठे उपस्थित होते.  देव संस्थान आणि जेजूरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना समरसतेच्या कार्यासाठी मानपत्र प्रदान करण्यात आले. सरसंघचालकांनी यावेळी देवाचा तळी भंडारा केला. यावेळी देवाच्या खंडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली.

गडावर येत्या काळात नवीन भक्तनिवास उभारण्यात येणार असून, गुरूकुल पद्धतीचे शिक्षणही उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमूख विश्वस्त अनिल सौंदडे यांनी यावेळी दिली.  यावेळी द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन सरसंघ चालकांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमुख १२ ठाणी आहेत. याचे दर्शन जेजूरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने देव संस्थान आणि पूरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी उभारण्याचे कार्य होणार आहे.     

श्री खंडेरायाची पगडी, घोंगडे आणि भारतमातेच्या प्रतिमेने संरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. स्वागत मंगेश घोणे, प्रास्ताविक अनिल सौंदडे यांनी केले. तर मानपत्राचे वाचन पोपट खोमणे यांनी केले.

भौतिक जगातील वैभवाबरोबरच आध्यात्मिकतेतील प्रविणता सांगणारा आपला धर्म आहे. जेजुरी गडाच्या परिसरात परकीय आक्रमक स्वस्थपणे झोपू शकला नाही. धर्म ज्या श्रद्धेमुळे आहे. त्याची जागृती करणारे हे ठिकाण आहे.

- डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ

Web Title: Khandoba is the deity of the country's freedom fighters; Sarsangchalak Dr. Awarded by Mohan Bhagwat, Jejuri Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.