खोडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:17 AM2021-03-04T04:17:11+5:302021-03-04T04:17:11+5:30
बाळकृष्ण लोहकरे यांना भाषा रत्न पुरस्कार प्रदान खोडद : बोरी बुद्रुक येथील श्रीसंभाजी विद्यालयातील हिंदी विषयाचे अध्यापक बाळकृष्ण लोहकरे ...
बाळकृष्ण लोहकरे यांना भाषा रत्न पुरस्कार प्रदान
खोडद : बोरी बुद्रुक येथील श्रीसंभाजी विद्यालयातील हिंदी विषयाचे अध्यापक बाळकृष्ण लोहकरे यांना नुकतेच भाषा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोवा हिंदी अकादमी,गोवा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलन गोव्याची राजधानी पणजी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यामध्ये चर्चासत्र, कविता वाचन यांचे आयोजन केले होते. तसेच हिंदी भाषा प्रचार-प्रसार आणि संवर्धन करण्याऱ्या शिक्षकांना आदर्श हिंदी भाषा प्रचारक "भाषारत्न" पुरस्कार देखील देण्यात आले.
यामध्ये शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पाच हिंदी विषय शिक्षक बाळकृष्ण गणपत लोहकरे (श्री संभाजी विद्यालय, बोरी बु।।) , प्रदीप बबन गाढवे (चैतन्य विद्यालय, ओतूर), रवींद्र गजानन डुंबरे( संतगाडगे महाराज विद्या निकेतन पिंपळगावजोगा), बशीर गुलाब शेख (सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, ओतूर), सुरेश चंद्रकांत लांडे (अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, जुन्नर) यांना नुकतेच प्रदान करण्यात आल्याची माहिती जुन्नर तालुका हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण लोहकरे यांनी दिली.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथील मिरामार येथील सोलमार सभागृहात माजी केंद्रीय कायदेमंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री . रमाकांत खलप, कला सांस्कृतिक व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, मुख्य संयोजक कैलास जाधव, संमेलनाध्यक्ष प्रभाकर ढगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील शेठ, बिजू भाई या मान्यवरांच्या उपस्थितीत सोलमार सभागृहात या सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. संघाचे उपाध्यक्ष संतोष झावरे, विजय कापरे, सचिव लक्ष्मण डुंबरे आदींसह सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद व तसेच जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे यांनी अभिनंदन केले.