खराडीकर रंगले लोकमत धमाल गल्लीत

By admin | Published: May 8, 2017 03:19 AM2017-05-08T03:19:48+5:302017-05-08T03:19:48+5:30

खराडीत रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मर्स, पुणेरी

Kharadikar Rangale Lokmat Dhamal Galati | खराडीकर रंगले लोकमत धमाल गल्लीत

खराडीकर रंगले लोकमत धमाल गल्लीत

Next

खराडीत रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट,  बँड परफॉर्मर्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात  आला होता.  लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक खेळ ठेवण्यात आले. च्डीजेचा ठेका... जल्लोष आणि नृत्य अशी धमाल मुलांनी या धमाल गल्लीत केली. सहभागी झालेले लहानथोर बक्षिसांचे मानकरी ठरले.

उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटत खराडीतील विद्यार्थ्यांनी खराडीतील झेन्सार टेक्नॉलॉजीज, रिलायन्स मार्टजवळ खराडी आयटी पार्क रस्त्यावर मुलांना लोकमतच्या धमाल गल्ली कार्यक्रमात सहभाग घेऊन फुल कल्ला केला. रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मुलेच नाही तर सर्वच वयोगटांतील नागरिकांनी विविध खेळ खेळत धमाल केली.

मुलांचे आई-वडीलही यात सहभागी झाले. नकळत लहानपणीच्या दिवसांची सैर या निमित्ताने झाल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात आपल्या मुलांसोबत ज्येष्ठांनी धमाल केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सकाळच्या उन्हात सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. ‘झुंबा’द्वारे आरोग्याचा मंत्रही देण्यात आला.

४या कार्यक्रमाचे सहप्रायोजक बेलमॅक रेसिडेन्सी व हिरो ड्युएट, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सायकल पार्टनर - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर - मॅक्स, किडस पार्टनर - लिटल अ‍ॅली (विमान नगर), रिदम पार्टनर - ताल इंक व प्रायोजक मॅपल ग्रुप हे होते.
४लोकमत बालविकास मंच या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस व पुणे वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.
४झुम्बासाठी राहिल चौहान व बॉलिवूड डान्ससाठी स्वप्निल हुमने यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Kharadikar Rangale Lokmat Dhamal Galati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.