खरीप पीक पॅटर्न बदलतोय

By admin | Published: August 31, 2016 01:23 AM2016-08-31T01:23:41+5:302016-08-31T01:23:41+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे.

Kharif crop pattern is changing | खरीप पीक पॅटर्न बदलतोय

खरीप पीक पॅटर्न बदलतोय

Next

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे. भाजीपाला, कडधान्ये व फळलागवडीकडे शेतकरी वळत आहेत.
जिल्ह्यात खरिपात ६ हजार ६६३.४७ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली असून, सोयाबीन ३९५, मूग २१६ तर मका यांची १६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे असलेले भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून, या वर्षी ७२ टक्केच लागवड झाली आहे.
गेली काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळेही हा बदल होत आहे. या वर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस असल्याने या परिसरात घेत असलेल्या खरीप हंगामाची स्थिती चांगली आहे. ऊस वगळता १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली आहे. आजअखेर एकूण १०,५८२.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ८१४.० मि.मी. आहे. हा पाऊस पश्चिम भागात चांगला झाला असून, खरीप पिके याच क्षेत्रात घेतली जातात.
यात भातपीक हे सर्वांत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, काही दिवसांपासून भाताचे क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी ७ हजार २९०.५३ हेक्टरवर भातपीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७२ टक्के म्हणजे ५ हजार २१०.८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यापुढे लागवड होणार नसल्याने हे क्षेत्र याही वर्षी घटले आहे. मुळशी, मावळ, हवेली, भोर व वेल्हे या तालुक्यांत जमीनविक्री वाढली आहे. त्यामुळे जमिनीला कंपाऊंड पडले असून, तेथे पीक घेणे बंद झाले आहे. त्यामुळे भातपीक कमी होत असल्याचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातही नागरी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्गाची भाजीपाला, फळे, कडधान्यांची जास्त मागणी आहे. हे लक्षात घेता, पारंपरिक पीक न घेता मागणीप्रमाणे पीक घेण्याकडे शेतकरी वळत आहे.


बाजरीचे मोठे क्षेत्र होते. त्याची जागा आता बटाटापीक घेत आहे. तसेच, येथे सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी तर ३९५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे.


१० ते १५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्वारीपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. तेथील शेतकरी आता मकापिकाकडे वळत आहेत.

Web Title: Kharif crop pattern is changing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.