पावसाअभावी खरिपाच्या पिकांना धोका; शेतकऱ्यांना चिंतेने वेढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:11 AM2018-09-16T02:11:55+5:302018-09-16T06:32:20+5:30
सोयाबीन, बटाटा पिकांचे उत्पादन घटण्याची निर्माण झाली शक्यता
दावडी : पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. खेड तालुक्याच्या भागातील पिके कडक उन्हामुळे अक्षरश: होरपळून निघत आहेत. सोयाबीन, बटाटा या पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील बळीराजा पावसाची वाट पाहत आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदा म्हणावा असा पाऊस पडला नाही. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात पाऊस पडताच बटाटा व सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. त्या शेतकºयांनी पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीची मशागत केल्याचे दिसत आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी पिकांच्या उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. बटाटा शेतात पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बटाटा जमिनीत फुगण्यास वाव मिळत नाही. अर्थात बटाट्यांची वाढ खुंटली आहे.
कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. याशिवाय खरिपाबरोबरच आगामी रब्बी हंगाम सध्या तरी धोक्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे. खेडच्या पश्चिम भागात काही भागात जोरदार पाऊस झाला असताना तालुक्यातील पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस झाला.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला थोडेफार पाणी येत आहे. मात्र, या पाण्याचा फायदा नदीकाठच्या गावांना होईल. इतर गावांतील शेतकºयांची चिंता कायम आहे. पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांसह सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
रब्बीची चाहूल लागली आहे आणि आता रब्बीच नियोजन कसे करावे, यासाठी बळीराजाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास रब्बी हंगामातील पेरण्या लांबणार असून, परिणामी उत्पादनही घटणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
दुष्काळाचे पसरले सावट
वाल्हे : परिसरात पंधरा दिवस होऊन गेले पाऊस पूर्ण थांबला असून त्यामुळे शेतकºयाचा खरीब हंगाम धोक्यात आला आहे. पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले जून, जुलै, आॅगस्ट संपला सप्टेंबर निम्मा झाला तरी जोराचा पाऊस झाला नाही. त्यामुळे चालू हंगाम जाण्याची शक्यता आहे.
या परिसरात दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. आठ दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकºयाची चिंता वाढली आहे. पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या वाल्हे परिसरातील सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, बाळाजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी या ठिकाणचा खरीब हंगाम पाऊस नसल्यामुळे वाया गेला आहे.
त्यातूनही वाल्हे पश्चिमेकडील परिस्थिती बरी होती. पण उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे जिरायत भागातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.