पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

By admin | Published: July 8, 2017 01:58 AM2017-07-08T01:58:16+5:302017-07-08T01:58:16+5:30

जुन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकाला पाण्याचा ताण पडला आहे.

Kharif crops threatened due to rain failure | पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : जुन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकाला पाण्याचा ताण पडला आहे. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील वाढ झालेली नाही.
या वर्षी सहा जूनलाच पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु, पावसाने पुन्हा उघडीप दिल्यामुळे पेरण्या खोळबल्या होत्या. दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या.
खरिपातील भुईमूग, सोयाबीन तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील आणे, शिंदेवाडी या भागातील बाजरी, उडीद, मठ, हुलगा या पिकांचा चांगला उतार झाला असून आता पाण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभर कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाच्या सरी पडतात, असा पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे पिकांना पाणीटंचाई जाणवत आहे.
या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण
आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या माणिकडोह धरणात १५ टक्के पाणीसाठा आहे.

Web Title: Kharif crops threatened due to rain failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.