खरीप हंगाम पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:17+5:302021-06-23T04:09:17+5:30
सुरुवातीला बहुतांश भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. मात्र मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने उसंत दिली. काही भागांत अधून-मधून पाऊस पडत ...
सुरुवातीला बहुतांश भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. मात्र मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने उसंत दिली. काही भागांत अधून-मधून पाऊस पडत असला तरी अपवाद सोडला, तर बहुतांश भागात पेरणीयुक्त पाऊस झालेला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरूवातीला झालेला पाऊस पुरेसा नव्हता. तरीही पेरणीसाठी अगोदरच सज्ज असलेल्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप देताच, जमिनीला वापसा आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी बाजरी,सोयाबीन पेरणीला सुरवात केली आहे.
सूर्यफूल ही लागवड करीत असल्याचे दिसत आहेत.
वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात तसेच, दौंडज, पिसुर्टी, जेऊर, मांडकी, सुकलवाडी, आडाचीवाडी, वागदरवाडी, पिंगोरी या पट्ट्यात पेरणी पुरेशा पाऊस झाल्यामुळे खरिपाची काही ठिकाणी पेरण्याला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी पेरणीला पुरेसा पाऊस नसल्यामुळे अजून पेरणीला सुरुवात केली नाही. तर ठिकाणी मशागती करून रान तयार करुन ठेवली जात आहेत.
बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरने तर काही ठिकाणी बैलजोडीने मशागत व पेरणी केली जात आहे.
वाल्हे परिसरात काही ठिकाणी खरीप पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे वापसा होईल तसी पेरणीला सुरुवात झाली आहे.