कोरोनाच्या लढ्यात खेड तालुक्यातील पोलिस पाटलांनी उचलला खारीचा वाटा. दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:52+5:302021-05-05T04:17:52+5:30
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, मदतीचा एक हात म्हणून खेड तालुक्यातील ...
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, मदतीचा एक हात म्हणून खेड तालुक्यातील १८० पोलीस पाटील यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दोन लाख रुपये मदतीचा धनादेश खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राळे, खेड तालुका पोलीस पाटील संघटना उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे, महिला अध्यक्ष तृप्ती मांडेकर, पप्पूकाका राक्षे, निलेश दौंडकर, सचिन वाळुंज, दादाभाऊ खंडागळे, कार्याध्यक्ष अमोल पाचपुते व तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
राज्यात कोरोना महामारीने अनेकांचे बळी गेले आहेत. एक सामाजिक बांधलिकी म्हणून खेड तालुक्यातील पोलिस पाटलांनी एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. तसेच राज्यातील पोलीस पाटीलही आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहे.
बाळासाहेब शिंदे ( राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष )
खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र व धनादेश पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्याकडे देताना बाळासाहेब शिंदे व पोलीस पाटील