खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 02:28 AM2018-10-30T02:28:52+5:302018-10-30T02:29:13+5:30

डोंबेवाडी तलावातील पाण्याचे पूजन; पुरंदर योजनेतून दौंड जिरायत भागाला पाणी देण्याची मागणी

Kharla reached Purandar bay water | खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

Next

खोर : अनेक दिवसांपासून पुरंदर योजनेतून दौंड तालुक्याच्या जिरायत भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी होती. यानुसार आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी तलावत पाणी सोडण्यात आले असून, त्याचे जलपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आमदार कुल म्हणाले, की आपण पाण्यासंदर्भात उशिरा मागणी करीत असतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी बंद व्हायला आणि तुम्ही पाणी मागायला एकच वेळ होत असते. त्यामुळे खोर परिसरातील तलाव पूर्ण भरू जात नाहीत व देऊळगावगाडा व खालील भागाला या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये करावी व त्यानुसार पाण्याचे नियोजन होऊन पाणी वेळेवर सुटून या भागामधील सर्वच गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. शासन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. असे आवाहन कुल यांनी केले.

या वेळी ग्रामस्थांनी अजून एक आवर्तन पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात दिवाळी झाल्यानंतर सोडण्याची मागणी केली आहे. यावर कुल म्हणाले, मलादेखील पाण्याचा अंदाज येत नाही. कारण सध्या पाऊसच झाला नसल्याने सर्वच ठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र माझी अजून एक आवर्तन सोडण्याच्या बाबतीत सिंचन विभागाच्या अधिकारी वर्गाबरोबर मीटिंग चालू असून लवकरच दुसरे आवर्तन सोडण्यास प्रयत्नशील राहणार आहे.|

या प्रसंगी सरपंच सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, मधुकर चव्हाण, भानुदास डोंबे, गणेश साळुंंखे, जालिंंदर डोंबे, पांडुरंग डोंबे, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, राहुल चौधरी, शिवाजी चौधरी, सुहास चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र डोंबे, विकास चौधरी, मेहबूब पठाण, तानाजी डोंबे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.

दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या भागामधील ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे पुरंदर जलसिंचन उपास योजेनेतून पाणी डोंबेवाडी तालावात सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार कुल यांनी स्थानिक नागरिक व सरपंच यांना विचारात घेऊन पुणे-मुंबई येथील सिंचन भवनावर सिंचन योजनेचे अधिकारी व प्रशासन, शासन यांच्यासोबत बैठक घेतली.
सर्वप्रथम डोंबेवाडी तलाव हा पुरंदर सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घेतला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून जवळपास एक आठवडा डोंबेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असल्याने खोर ग्रामस्थांनी कुल यांचे अभिनंदन व पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.

जिरायती भागाकडे माझे संपूर्ण लक्ष असून या भागातील शेतकरीवर्गाच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन. तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येथून मागील काळात शेतकºयांना ५० टक्के रक्कम भरावी लागत होती; परंतु आता १९ टक्केच रक्कम भरावी लागणार असून बाकीची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे पाणी आणणे ही काय कठीण बाब नाही, असे कुल म्हणाले.

Web Title: Kharla reached Purandar bay water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.