खरपुडीला यंदा सोमवती यात्रा नाही, भक्तांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:06 AM2018-10-05T02:06:33+5:302018-10-05T02:06:50+5:30

अमावास्येमुळे अडचण : भक्तांचा हिरमोड

Kharudi does not visit Somvati this year, Dehradors of the devotees | खरपुडीला यंदा सोमवती यात्रा नाही, भक्तांचा हिरमोड

खरपुडीला यंदा सोमवती यात्रा नाही, भक्तांचा हिरमोड

googlenewsNext

दावडी : प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेले खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील खंडोबा देवाची सोमवारी (दि. ८) सोमवती यात्रा भरणार नाही.
या दिवशी सकाळी ११ वाजून ३२ मिनटांनी अमावसया सुरू होत असून ही अमावास्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ९ वाजून २७ मिनिटांनी संपते. सोमवती अमावास्येच्या दिवशी उगवत्या सूर्याला अमावास्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा निघणार नसल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब गाडे यांनी सांगितले.

निमगाव येथेही नाही भरणार यात्रा
निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे ही सोमवती अमवस्या नसल्याने स्नानासाठी देवाची पालखी भिमा नदीवर जाणार नाही. यात्रा भरणार की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने बैठक घेऊन हा निर्णय जाहिर केला. जय मल्हार यात्रा ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, पोलिस पाटील बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

Web Title: Kharudi does not visit Somvati this year, Dehradors of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे