खावटी अनुदान योजनेचा ४६ आदिवासींना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:29+5:302021-08-26T04:13:29+5:30
ठाकरवाडीतील कळमजाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनुसूचित जमातीच्या आदिवासी समाजातील ४६ कुटुंबांना खावटीवाटप करण्यात आले. ही योजना ...
ठाकरवाडीतील कळमजाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनुसूचित जमातीच्या आदिवासी समाजातील ४६ कुटुंबांना खावटीवाटप करण्यात आले. ही योजना मागील काही वर्षांपासून बंद केली होती. जुन्नर तालुका चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण पारखे, माजी जि. प. सदस्य मारुती काळे, भाऊ देवाडे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भालेकर, राजश्री काळे, स्नेहल कांकरिया, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी, खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप, गणेश वाजगे, बाळा खैरे, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी डी. बी. कालेकर, वरिष्ठ निरीक्षक चव्हाण, पाखरे, निमगिरे, शेलकंदे, घोलप, तुळशीदास कोऱ्हाळे, संतोष ढोबळे ,नितीन डावखरे उपस्थित होते.
अमित बेनके म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजना गेली अनेक वर्षे बंद होती . त्यातच कोरोना महामारीमुळे आदिवासी बांधव हे आर्थिक अडचणीत होते. आमदार अतुल बेनके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आदिवासी भागातील खावटी अनुदान योजना सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून जुन्नर तालुक्यातील अनुदानाचे वाटप ३ हजार ३०० लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, वारुळवाडी गावच्या ४६ लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला आहे . या योजनेमध्ये लाभार्थ्यांला २ हजारांचा किराणा किट व बँक खात्यात २ हजार जमा करण्यात येणार आहे. या योजनेचे पुढील वर्षी अजून लाभार्थी वाढ होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरपंच मेहेर यांनी सांगितले.
२५ नारायणगाव खावटी
लाभार्थींना अन्नधान्याचे किराणा किट वाटप करताना अमित बेनके, राजेंद्र मेहेर व इतर.
250821\img-20210823-wa0259.jpg
आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजने अंतर्गत वारूळवाडी ग्रामपंचातीच्या हद्दीतील लाभार्थीना अन्न धान्याचे किराणा किट वाटप करताना अमित बेनके ,राजेंद्र मेहेर व मान्यवर