खावटी योजना आदिवासी कुटुंबांची आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:35+5:302021-07-29T04:11:35+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव व प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ, जुन्नर अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय घोडेगाव यांचे मार्फत ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव व प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ, जुन्नर अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय घोडेगाव यांचे मार्फत तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागांतर्गत खावटी अनुदान योजना सन २०२१ वाटपाचा शुभारंभ शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर येथे संपन्न झाला. त्या वेळी तांबोळी बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवराम कोकाटे, मुख्याध्यापक विठ्ठल नरसाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण वायळ, सरपंच कमल लोहकरे, पोलिस पाटील उत्तम वाघमारे, सतिश भोते, सदस्य अरूण उंडे, दुंदा जढर, गणपत गुरखेल, अंबादास जाधव, विष्णु साखरे, राजाराम भागवत, भास्कर लोखंडे, सचिन लांडे, सुनिता सातपुते, राहुल अक्कानवरू, अभिमन्यू भुजबळ, अक्षय कोकाटे, सुरेश दुरगुडे, सुनील खुळे, कुलदीप मगर, उमाजी खमसे, वामन केवाळे, कोंडीबा बुरसे, काळू डगळे,रविंद्र खरात उपस्थित होते.
सलीम तांबोळी म्हणाले, आदिवासी विकास विभागामार्फत सन २०२०-२०२१ मध्ये कोव्हीड-१९ विषाणू प्रादुर्भाव वाढल्याने खावटी अनुदान योजना पुनर्जीवित करून आदिवासींना डीबीटीद्वारे त्यांचे वैयक्तिक खातेवर रोख रक्कम दोन हजार रुपये व दोन हजार रुपये किमतीचे अन्नधान्य वाटप सुरु आहे. यात घोडेगाव प्रकल्प अंतर्गत येणारे पुणे, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील ३१ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा २४ वसतिगृह यांचे सर्व वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी मार्फत सर्व्हे करून २० हजार ८६५ लाभार्थींनी फॉर्म भरले. यापैकी निकषांनुसार १३ हजार ८६२ लाभार्थी पात्र ठरून त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.
२८ तळेघर खावटी
खावटी योजनेच्या शुभारंभप्रसंगी मान्यवर.