खेडचे शेतकरी आक्रमक

By admin | Published: October 30, 2014 10:58 PM2014-10-30T22:58:29+5:302014-10-30T22:58:29+5:30

बाहेरून बाह्यवळण काढण्यासाठी संपादित करावयाच्या जमिनींच्या मोजणी नोटिसा राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी येथील संबंधित शेतक:यांना काढण्यात आल्या आहेत.

Khed farmer aggressive | खेडचे शेतकरी आक्रमक

खेडचे शेतकरी आक्रमक

Next
राजगुरुनगर : पुणो-नाशिक महामार्गाला राजगुरुनगर बाहेरून बाह्यवळण काढण्यासाठी संपादित करावयाच्या जमिनींच्या मोजणी नोटिसा राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी येथील संबंधित शेतक:यांना काढण्यात आल्या आहेत. ही मोजणी 1क्, 11 व 13 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. शेतक:यांचा मात्न या बाह्यवळण मार्गाला विरोध असल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
राजगुरुनगरच्या तलाठी कार्यालयाकडून शेतक:यांना या नोटिसा बजावण्यात आल्या. यापर्वी 8 महिने अगोदर नोटिसा देऊन हरकती मागविण्यात आल्या होत्या; पण त्या हरकतींवर सुनावणी न होता मोजणीच्या  नोटिसा काढण्यात आल्या आहेत. 
राजगुरुनगरच्या सव्र्हे क्रमांक 232/1 ते 271/1 मधील 83 गटातील शेतक:यांना; राक्षेवाडीतील सव्र्हे क्रमांक 24/1 ते 38/2, 66/1 ते 68/4, 75/1 ते 77/2 या गटांतील 1क्7 जणांना आणि होलेवाडीतील सव्र्हे क्रमांक 75 ते 124 या गटांतील 86 जणांना वारसदारांसह नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
हे बाह्यवळण राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी, चांडोली, सांडभोरवाडी, वरची भांबुरवाडी, जैदवाडी या गावांच्या काही जमिनीमधून जात आहे. शेतक:यांचा त्याला विरोध असून, राजगुरुनगरमधून जाणा:या महामार्गालगतची अतिक्रमणो काढून त्याचे गावातूनच रुंदीकरण करावे, असे त्यांचे म्हणणो आहे. 
खेड पंचायत समितीचे उपसभापती सतीश राक्षे, सांडभोरवाडीच्या सरपंच कविता पाचारणो, राक्षेवाडीच्या सरपंच संध्या राक्षे, माजी सरपंच अशोक राक्षे, माजी उपसरपंच मच्छींद्र राक्षे, सदस्य सुभाष होले, होलेवाडीचे उपसरपंच नवनाथ होले, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष गाढवे आदी पदाधिका:यांनी याविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
 
4सध्या राजगुरुनगर ते सिन्नर असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत हे बाह्यवळण काढण्यात येणार आहे. चांडोली जवळून होलेवाडी, राक्षेवाडीमार्गे डाकबंगला आणि पानमळा वस्तीजवळून झनझनस्थळ, जैदवाडीमार्गे माळेगाव असे हे बाह्यवळण आहे. यातील पानमळा, झनझनस्थळ, जैदवाडी या गावांतील लोकांच्या जमिनी थेट संपादित करून नुकसानभरपाई स्वीकारण्याचे पत्न 25 सप्टेंबर रोजी भूसंपादन अधिका:यांनी दिले आहे.
 
4पुणो नाशिक महामार्गाला राजगुरुनगर परिसरातून दोन टप्प्यात बाह्यवळण काढले जाणार आहे. पहिला टप्पा चांडोली, होलेवाडी,राक्षेवाडी या गावांच्या हद्दीतून प्रस्तावित आहे, 
तर दुसरा टप्पा पानमळा, झनझन स्थळ , वरची भाम्बुरेवाडी या गावांच्या हद्दीतून जाणार आहे. 
 
4पुणो-नाशिक महामार्ग राजगुरुनगरमध्ये अरुंद झाल्याने वारंवार वाहतूककोंडी होते. या भागात नैसर्गिक परिस्थितीमुळे 
आणि अतिक्रमणांमुळे महामार्गाचे रुंदीकरण अशक्य झाले आहे. 

 

Web Title: Khed farmer aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.