खेड पंचायत समितीच्या उपसभापती चांगदेव शिवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:14+5:302020-12-30T04:15:14+5:30

सकाळी १० ते १२ वाजेपर्यत उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने अमर कांबळे आणि अपक्ष म्हणुन चांगदेव शिवेकर यांनी नामनिर्देशन पत्र ...

Khed Panchayat Samiti Deputy Chairman Changdev Shivekar | खेड पंचायत समितीच्या उपसभापती चांगदेव शिवेकर

खेड पंचायत समितीच्या उपसभापती चांगदेव शिवेकर

googlenewsNext

सकाळी १० ते १२ वाजेपर्यत उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने अमर कांबळे आणि अपक्ष म्हणुन चांगदेव शिवेकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने तीन चार तास राजकीय घडामोडींना वेग आला होता. दुपारी तीन वाजता पिठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पधंरा मिनिटांसाठी माघारीचा वेळ दिला अखेर अमर काबंळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने निवडणुकीची शक्यता संपुष्टात आणण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आल्याने चागंदेव शिवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रांत विक्रांत चव्हाण यांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी अजय जोशी, नायब तहसीलदार संतोष चव्हाण, उपस्थित होते.तर या निवडणुक प्रक्रियेत सभापती भगवान पोखरकर आजारी असल्याने अनुपस्थित होते तर वैशाली जाधव या गैरहजर होत्या. यावेळी सभागृहात पंचायत समिती सदस्य अमोल पवार, अरुण चौधरी, अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, शुभद्राताई शिंदे, मंच्छिंद्र गावडे, मंदाबाई शिंदे, नंदाताई सुकाळे, वैशाली जाधव, सुनिता सांडभोर उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यापुर्वी उपसभापती पदी विराजमान झालेल्या ज्योती अरगडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापती पदावर अमर काबंळे ठरल्याप्रमाणे दावेदार होते मात्र एका दिवसात सुत्रे फिरवत चांगदेव शिवेकर यांना संधी मिळाली. सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्या सुनिता सांडभोर आणि वैशाली जाधव यांनी सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केल्यामुळे निवडणुक घेण्याची नामुष्की सेनेवर ओढवली होती त्यामुळे यावेळी अनपेक्षित सत्ताबळातुन ऐनवेळी आघाडीत बिघाडी नको म्हणुन शिवसेनेने आपली सत्ता राहावी म्हणुन पध्दतशीर पणे चाल खेळल्यामुळे खेड पंचायत समितीवर आपली सत्ता निर्वाविवाद राखण्यात शिवसेनेला यश आले. मात्र उपसभापतीपदाची निवड होताच चागंदेव शिवेकरांचा शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहिर होताच चागंदेव शिवेकरांनी काही वेळातच युटर्न घेऊन मी अपक्ष म्हणुनच राहणार असुन कोणत्याही पक्षात जाणार नसल्याच्या प्रतिक्रिया दिली.

चांगदेव शिवेकर यांचा सत्कार माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील.

२८राजगुरुनगर

Web Title: Khed Panchayat Samiti Deputy Chairman Changdev Shivekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.