तीन गावठी पिस्तुलासह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त; खेडमध्ये पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 09:50 AM2022-11-21T09:50:08+5:302022-11-21T09:52:04+5:30
पोलिसांनी दोघांच्या मुसक्सा आवळल्या आहेत...
राजगुरुनगर (पुणे) : खेडच्या ग्रामीण भागात ३ गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त करीत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.आकाश आण्णा भोकसे (वय २३ ), महेश बाबाजी नलावडे हे (वय २३ ) हे दोघेही राहणार कुरकुंडी, ता. खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन इसम काळ्या रंगाच्या बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळेकडे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करीत दोघांची अंगझडती घेतली असता आकाश भोकसे यांच्या कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश नलावडे याचे याचे कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांचे मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नेताजी गंधारे, शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, विक्रमसिंह तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, निलेश सुपेकर दगडू वीरकर यांच्या पथकाने केली.