खून करून पसार झालेले आरोपी खेड पोलिसांनी केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:27+5:302021-09-09T04:14:27+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रेटवडी येथील कॅनॉलमद्ये ३०-३५ वयवर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी त्याचा ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रेटवडी येथील कॅनॉलमद्ये ३०-३५ वयवर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यावर तो मृतदेह राहूल सुभाष मोहिते (वय ३०) यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी गुन्हाचा तपास केल्यावर राहुल मोहिते यांच्याशी बाबा मोहिते आणि सचिन मोहिते यांचे जागेच्या कारणावरून भांडण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयत राहुल मोहिते याने किरण साळुंखेच्या वडीलांना काही दिवसापूर्वी एस. टी. बस स्थानक येथे मारहान केल्याचेही समोर आले. त्या रागातून ३२ ऑगस्ट बाबा तुकाराम मोहिते आणि सचिन तानाजी मोहिते यांनी शकर मोहिते, जयेश नाइकरे यांच्याबरोबर संगनमत करून राहुलच्या घरात घुसून धारदार शस्त्रांनी त्याला मारहाण केलाी, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राहूल याचा मृतदेह चासकमानच्या डाव्या कालव्यात टाकून दिला होता.
सचिन तानाजी मोहिते याला खेड तालुक्यातील तर किरण देविदास साळुंके चास येथून ताब्यात घेण्यात आले. जयेश संदीप नाईकरे (रा. सिद्धीविनायकनगर, मेदनकरवाडी चाकण ता. खेड) यालाही चाकण येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी पोलिसांकडे खूनाची कबुली दिली आहे.