कतलीसाठी जाणारा जनावरांचा टेम्पो खेड पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:14+5:302021-03-28T04:11:14+5:30
याप्रकरणी टेम्पो चालक सलिम कादर इनामदार (वय ५३, रा. जुन्नर) व जनावरे मालक महंमद चौधरी व अहमद चौधरी (दोघे ...
याप्रकरणी टेम्पो चालक सलिम कादर इनामदार (वय ५३, रा. जुन्नर) व जनावरे मालक महंमद चौधरी व अहमद चौधरी (दोघे रा. खलीलपुरा, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व जनावरे भोसरी येथील पांजरपोळ सेवा संघाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना एक टेम्पो बेकायदेशीरपणे जनावरे कतलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सागर शिंगाडे, अमोल चासकर यांनी पुणे-नाशिक रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर एक टेम्पो येताना दिसून आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालक सलिम कादर याच्याकडे विचारणा केली असता त्याने गाडीत जनावरे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नव्हता. गाडीमध्ये चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे २० लहान मोठ्य जनावरांना कोंबण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी जप्तीचा पंचनामा करून तिघाजणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार सुधीर शितोळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस राहुल लाड करत आहेत.