खेड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक; चार दिवस उलटल्यानंतर देखील कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:25 PM2020-07-21T21:25:11+5:302020-07-21T21:29:51+5:30
रिपोर्ट अद्यापपर्यत न आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्युटी करायची की क्वारंटाईन व्हायचे हा प्रश्न
राजगुरुनगर: चार दिवस उलटूनही खेड पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांचे कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे पोलिस कर्मचारी घाबरून गेले आहे. खेड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.परंतू त्यांचे रिपोर्ट अद्यापपर्यत न आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्युटी करायची की क्वारंटाईन व्हायचे हा प्रश्न पडला आहे.
सहा दिवसांपूर्वी खेड पोलिस ठाण्यातील अधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती. गेले चार महिने या अधिकाऱ्याने लॉकडाऊन काळात तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्व:ता रस्त्यावर उतरुन नागरिकांना कोरोनाविषयी आवाहन व मार्गदर्शन केले होते.तालुका स्तरावर पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन कोरोना बाबत गावागावात काळजी घेण्याचे सांगितले होते.तसेच कंटेनमेंट झोन याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात यशस्वी झाले होते. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघाडल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते तत्काळ अॅडमिट झाले होते. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. मात्र पोलिस ठाण्यातील जे पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी त्यांच्या संपर्कांत आले होते. त्यांनी शनिवार ( दि १८ जुलै ) रोजी चांडोली (ता. खेड ) येथील कोविड सेंटरमध्ये स्वॅब दिले होते.मात्र, अद्यापपर्यत न आल्यामुळे संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ककर्मचाऱ्याची धाकधुक वाढली आहे. स्वॅब दिलेल्या पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन गर्दी हटवायची की,क्वारंटाईन व्हायचे, हा प्रश्न पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे पडला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचार्यांचे रिपोर्ट तरी वेळेवर येणे गरजेचे आहे असे पोलिस उपनिरिक्षक निलेश बडाख यांनी सांगितले आहे.
.............................................................
चांडोली ग्रामिण रुग्णालयात केविड सेंटर मध्ये काही पोलिसांचे स्वॅब शनिवारी व सोमवारी घेतले आहे. सगळीकडे लोड असल्यामुळे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागत आहे. यापूर्वी कोरोना रिपोर्ट २४ तासाच्या आतमध्ये येत होते. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचे घेतलेले स्वॅब आज दि. २१ रोजी लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
डॉ बळीराम गाढवे, तालुका वैद्यकीय अधिकारी.