कडुसमध्ये पोलिसांनी उद्ध्वस्त केला गावठी हातभट्टी दारुअड्डा; २ लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:15 PM2022-01-31T19:15:39+5:302022-01-31T19:23:46+5:30
राजगुरुनगर: कडुस (ता. खेड ) येथे गावठी हातभट्टी दारु अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्धवस्त केला असून ...
राजगुरुनगर: कडुस (ता. खेड ) येथे गावठी हातभट्टी दारु अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्धवस्त केला असून सुमारे दोन लाख २० हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दारू बनविण्याचे ५ हजार लिटर रसायन नष्ट केले. दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कडुस - मुसळवाडी (ता. खेड ) येथील तेलदरा परिसरात आडबाजूला गावठी हातभट्टी दारू बनविण्यात येत होती. खेड पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ५ हजार लिटर गावठी हात भट्टीचे गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन मिळून आले. हे सर्व रसायन पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने नष्ट केले. तसेच ४९० लीटर हातभट्टी गावठी दारू जप्त केली.
दारू बनविण्यासाठी वापर करण्यात येणारे साहित्य जप्त करून दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी राजु रामदास पगारे (रा. मोशी ता हवेली ), नारायण बारकु पितांबरे (रा. कडूस ता खेड ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण अधिक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार नवनाथ थिटे , संतोष घोलप, अमोल चासकर, सागर शिंगाडे यांनी केली.