खेड तालुक्यात ८२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:09 PM2021-06-22T19:09:21+5:302021-06-22T19:09:47+5:30

जनावरांच्या गोठयाकडे जात असताना शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्यामुळे जोरदार शॉक बसला

In Khed taluka, an 82-year-old farmer died on the spot due to electric shock | खेड तालुक्यात ८२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

खेड तालुक्यात ८२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी वीज वाहक पोलवरील एक तार तुटून शेतात पडली होती

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील साबुर्डी येथे शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेचा शॉक लागल्याने ८२ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मुत्यू झाला आहे. दामु नामदेव गोपाळे (रा. साबुर्डी ता खेड) असे वृध्द शेतकऱ्यांचे नांव आहे. हि घटना दि २२ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमाराम घडली. गोपाळे यांचा मुलगा शरद दामू गोपाळे  यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साबुर्डी येथे गोपाळे यांच्या शेतातुन विजेचे खांब गेले आहेत. काही दिवसांपूर्वी या पोलवरील एक वीज वाहक तार तुटून शेतात पडली होती. आज सकाळी शेतात गोपाळे यांचा मुलगा पेरणी करत होता. दरम्यान दामु गोपाळे हे शेतातून फावडी घेऊन जनावरांच्या गोठयाकडे जात होते. तेव्हा शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्यामुळे वीजेचा जोरदार शॉक बसून दामू गोपाळे यांचा जागीच मूत्यू झाला आहे.  

Web Title: In Khed taluka, an 82-year-old farmer died on the spot due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.