खेड तालुका महिला शिक्षक संघाचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:03+5:302021-02-09T04:12:03+5:30
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, नगरसेविका अर्चना घुमटकर, स्नेहल राक्षे, शिक्षक संघाचे नेते विठ्ठल ...
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, नगरसेविका अर्चना घुमटकर, स्नेहल राक्षे, शिक्षक संघाचे नेते विठ्ठल तांबे, खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तानाजी महाळुंगकर तसेच शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षिका नूतन कडलग यांनी शिक्षक संघाच्या कामाची पार्श्वभूमी मांडली. संघाच्या नवनिर्वाचित महिलाध्यक्षा पूनम मुळूक यांनी कार्यक्रमांची माहिती दिली. पोर्णिमा लोखंडे यांनी नीलिमा सांडभोर व विभावरी दंडवटे यांची प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच आलेल्या सर्व महिला शिक्षिकांचे हळदी-कुंकू, तीळगूळ व वाण देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या खेळातून चार विजेत्या स्पर्धक महिला शिक्षिका पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक पैठणी विजेत्या - विद्या शिंदे,
द्वितीय क्रमांक सोन्याची नथ विजेत्या - सुवर्णा कड /नाणेकर,तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला विजेत्या - मनीषा दौंडकर,उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या ; वैजयंता नाईकडे यांना देण्यात आली. रांगोळीकार ( चाकण शाळा,नंबर एक ) शिक्षिका रूपाली परदेशी यांचा अप्रतिम कलाकृती साकारल्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक महिला शिक्षक संघाच्या सरचिटणीस मनीषा लोखंडे यांनी केले, तर आभार विठ्ठल तांबे यांनी मानले.
खेड तालुका महिला शिक्षक संघाचे हळदी-कुंकू समारंभाला उपस्थित.