खेड तालुक्यातील ‘सेझ’चा पेच सुटणार!

By admin | Published: September 24, 2015 02:58 AM2015-09-24T02:58:48+5:302015-09-24T02:58:48+5:30

खेड येथील सेझ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली ‘केडीएल’ म्हणजेच खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी गुंडाळण्याची सेझबाधित शेतकऱ्यांची मागणी अखेर कंपनी प्रशासनाने

Khed taluka's 'sedate' to be screwed! | खेड तालुक्यातील ‘सेझ’चा पेच सुटणार!

खेड तालुक्यातील ‘सेझ’चा पेच सुटणार!

Next

राजगुरूनगर : खेड येथील सेझ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली ‘केडीएल’ म्हणजेच खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी गुंडाळण्याची सेझबाधित शेतकऱ्यांची मागणी अखेर कंपनी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर आजच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्य केली आहे. त्यामुळे सेझबाधितांच्या प्रदीर्घ लढ्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांना ‘केडीएल’ कंपनीतून विभागणी करून बाहेर पडावयाचे असेल त्यांना सहकार्य करावे, असा ठराव जोपर्यंत कंपनी करीत नाही, तोपर्यंत ‘केडीईल’ची वार्षिक सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका सेझबाधित शेतकऱ्यांनी घेतली होती. त्याप्रमाणे ही सभा आज पुणे येथील अल्पबचत भवन येथे सुरूहोताच शेतकऱ्यांनी निर्णय घेतल्याशिवाय इतर कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. सभेस शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या सभेत इतर कोणतेच कामकाज होऊ न देता कंपनी गुंडाळण्याकरीता त्वरित कारवाई सुरू करावी, अशी एकमुखी मागणी सभासदांद्वारे करण्यात आली. शेवटी कंपनी व्यवस्थापनाने यास अनुकुलता दर्शवीत लवकरच याकरीता ४५ दिवसांनी विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यावेळी शेतकरी सभासदांच्या मागणीप्रमाणे १५ टक्के विकसित जमिनीचा परतावा त्यांना देण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ‘केडीएल’ गुंडाळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अ‍ॅड. योगेश पांडे, राजेंद्र्र ढवाण पाटील, बापू करंडे, अभिनंदन बसणवार उपस्थित होते. ‘केडीएल’चे सर्व संचालक, एमआयडीसीचे अधिकारी अजित रेळेकर हेही उपस्थित होते.
गेल्यावर्षी २३ सप्टेंबर रोजीची वार्षिक सर्वसाधारण सभा उधळून लावली होती. ती सभा २० डिसेंबर रोजी पुन्हा कंपनीकडून आयोजित केली होती. तीही उधळून लावून शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली अल्पबचत भवनाच्या फाटकावर आंदोलन केले होते. त्यामुळे आजची सभाही होऊ देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. (वार्ताहर)

Web Title: Khed taluka's 'sedate' to be screwed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.