खेडचा सभापती ठरणार मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:34+5:302021-08-27T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचा सभापतीवर आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाल्याने सभापतिपदाच्या निवडीणुकीचा कार्यकम जाहीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचा सभापतीवर आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाल्याने सभापतिपदाच्या निवडीणुकीचा कार्यकम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि. ३१) खेड पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडणार आहे.
खेडच्या पंचायत समिती सभापतिपदी कोण विराजमान होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले असले, तरी दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांचे पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. याबाबत काय होणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेनेने पक्षादेश अर्थात व्हीप देऊनही पाचही बंडखोरांनी सभापतीच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने आता या बंडखोरांबाबत शिवसेना कोणती भूमिका घेते, हे येत्या काळात दिसणार आहे. सभापती निवडीणुकीचा कार्यकम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि. ३१) खेड पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडणूक कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० ते १२ च्या दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकृतीसाठी वेळ देण्यात आला आहे. तर, दुपारी २ वाजता निवडणूक सभा होणार आहे. या वेळी नामनिर्देशन पत्राची छाननी आणि माघारीसाठी वेळ देण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली. तहसीलदारांमार्फत १४ पंचायत समिती सदस्यांना निवडणुकीबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.