आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला खोडा, सत्ताधारी, प्रशासनाची अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:41 AM2019-01-10T01:41:03+5:302019-01-10T01:41:45+5:30
सत्ताधारी, प्रशासनाची अनास्था : जागतिक स्तरावरील ओळख पुसली जाणार
विश्वास मोरे
पिंपरी : संस्कृती आणि कला रक्षणाचे गोडवे गाणाऱ्या भाजपाला कलाविषयक उपक्रमांचा विसर पडला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणाºया पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे, सावळ्या गोंधळामुळे खोडा घातला आहे. परिणामी, यंदाचा पिफ चित्रपट महोत्सवापासून चिंचवडकरांना मुकावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यापासून वारकºयांना भेटवस्तू देणे, विविध महोत्सव न राबविण्यावर भर दिला जात आहे. संस्कृती आणि कलारक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाला चित्रपट, संगीत आणि कलाविषयक उपक्रमांचा विसर पडला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण दाखवून शहराच्या लौकिकात भर टाकणारे महोत्सव, चांगले पायंडे बंद पाडले जात आहेत. राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना पाच वर्षांपूर्वी महापौर शकुंतला धराडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम असताना पुणे आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे पिंपरीत विस्तारीकरण झाले. पीफचे प्रवर्तक जब्बार पटेल यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडकर शहरात पीफची सुरुवात झाली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलावंतांना अनुभवण्यास शहरवासीयांना मिळत होते. चिंचवड येथील बिग बझार येथील बिग सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन केले जात होते. त्यानंतर भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कालखंडातही गेल्या वर्षी पीफचे आयोजन केले होते. पुण्यात यंदाचा पीफ १० ते १७ जानेवारी या कालखंडात होणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी प्रतिसाद न दिल्याने यंदा शहरात महोत्सव होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले.
आजपर्यंत महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, मराठी अभिनेते रमेश देव, सीमा देव, बॉलीवूड स्टार नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले आहे. महोत्सवाच्या रूपाने जागतिक पातळीवरील कलावंत शहरवासीयांना अनुभवण्यास मिळत होते.
अधिकाºयांचे दुर्लक्ष : पुढाकार कोणीच घेत नाही
महापालिका प्रशासन पिफ आयोजित न करण्यामागे न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत आहे. वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहूमहाराज महोत्सव अशा विविध महोत्सवांचे नामकरण करून महोत्सव आयोजित केले जात आहेत. महोत्सवांच्या आयोजनात महापालिकेतील अधिकाºयांचाही मोठा इंटरेस्ट असतो. पिफमधून आर्थिक लाभ होत नसल्याने या महोत्सवासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पिफवरच अन्याय का, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडमधील चित्रपटसृष्टीतील नागरिक उपस्थित करीत आहेत. महापालिकेतील अधिकाºयांच्या अनास्थेमुळे यंदाचा पिफ होणार नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विस्तारीकरण काही वर्षांपूर्वी केले. स्वतंत्र उद्घाटन सोहळाही आयोजित केला जातो. यंदाही आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संवाद साधला आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी आल्याने यंदाचा महोत्सव होऊ शकणार नाही. पुढील वर्षी महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रयत्न असेल.
- जब्बार पटेल,
प्रसिद्ध दिग्दर्शक