खोर-वढाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:09+5:302021-04-26T04:09:09+5:30
सध्या वढाणे घाटाखालून ते खोर येथील पिंंपळाचीवाडी हद्दी पर्यंत १३०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र वढाणे ते ...
सध्या वढाणे घाटाखालून ते खोर येथील पिंंपळाचीवाडी हद्दी पर्यंत १३०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र वढाणे ते सुपा हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीकोनातून पुर्णतः खराब झाला आहे. हा रस्ता दुरूस्त होणे गरजेचे असून या उर्वरित रखडलेल्या कामासाठी लवकरात लवकर निधीची उपलब्धता करून राहिलेले काम करण्याची मागणी ग्रामपंचायत च्या सदस्या प्रगती चौधरी यांनी केली आहे. दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यात जाण्यासाठी हा खोर-वढाणे रस्ता हा नजीकचा मार्ग असून या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. अनेकदा या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र या संदर्भात कोणीच दखल घेत नसल्यामुळे या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. वढाणे घाट माथ्याखालील रस्ता होऊन उपयोग नाहीतर संपूर्ण खोर- सुपा रस्ता होणे गरजेचे आहे. प्रशासन विभागाने याची दखल घेऊन उर्वरित राहिलेल्या कामाला लवकरात लवकर गती द्यावी अशी मागणी पुढे आली आहे.
२५ खोर
गेली अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर-वढाणे रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आले आहे.