खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पडले धूळखात, १ कोटी १३ लाख रुपये खर्च : आरोग्य सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:34+5:302021-03-22T04:09:34+5:30

आज या उपकेंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची आरोग्याची सुविधा उपलब्ध नसून येथील रुग्णांची सेवेअभावी मोठी हेळसांड होत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी ...

Khor's primary health sub-center collapses, costs Rs 1 crore 13 lakh: Lack of health facilities | खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पडले धूळखात, १ कोटी १३ लाख रुपये खर्च : आरोग्य सुविधांचा अभाव

खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पडले धूळखात, १ कोटी १३ लाख रुपये खर्च : आरोग्य सुविधांचा अभाव

Next

आज या उपकेंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची आरोग्याची सुविधा उपलब्ध नसून येथील रुग्णांची सेवेअभावी मोठी हेळसांड होत आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा शेंडगे म्हणाल्या की, मी नोव्हेंबर २०२० रोजी या उपकेंद्राचा पदभार स्वीकारला. मात्र आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा कर्मचारी वर्गाचा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध नसून रुग्णांना कुठल्याही प्रकारची आरोग्याची उपलब्ध होत नाही ही मोठी खंत आहे. आज पाहिले गेले तर ग्रामीण खेडेगाव असलेल्या खोर या ठिकाणी दिवसातून जवळपास २० ते २५ रुग्ण हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येत आहेत. परंतु अवघ्या उपलब्ध मेडिसिनवरच या रुग्णांना भागवले जात आहे. मला स्वतः दर महिन्याला वाड्या-वस्त्यांवर जाऊन ३ ते ४ वेळा जाऊन लहान मुलांसाठी लसीकरण करण्यासाठी जावे लागत आहे. गरोदर मातांचे शिबिर, शुगर असलेले रुग्ण, ब्लडप्रेशर रुग्ण या रुग्णाला घरोघरी जाऊन सुविधा पुरविल्या जात असल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा शेंडगे यांनी सांगितले आहे.

आज ही एवढी मोठी अवाढव्य इमारत ही धूळखात पडली असून केवळ एकच आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहे. अनेक महिन्यापासून कर्मचारी वर्ग नसल्याने या आरोग्य उपकेंद्रात आज अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. दवाखान्यात व दवाखान्याबाहेर तसेच दरवाज्यामध्येच गवत उगवले गेले आहे. १ कोटी १३ लाखाच्या इमारतीत एकच आरोग्यसेवक सध्या कार्यरत आहेत . आज कोरोनाचे रुग्ण खोर परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या बाबतीत कुठल्याही प्रकारची औषधे या उपकेंद्रात उपलब्ध नाहीत. तालुका प्रतिनिधींनी, खोर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, दौंड पंचायत समिती यांनी ही बाबतीत गांंभीर्याने घेऊन लक्ष घालून ही धूळखात पडलेली आरोग्याची सुविधा पुरवणारी खोरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

१ कोटी १३ लाखाच्या इमारतीत एकच आरोग्य सेवक नोव्हेंबर २०२० रोजी या उपकेंद्राचा पदभार स्वीकारला. मात्र आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा कर्मचारी वर्गाचा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध नसून रुग्णांना कुठल्याही प्रकारची आरोग्याची उपलब्ध होत नाही ही मोठी खंत आहे. आज पाहिले गेले तर ग्रामीण खेडेगाव असलेल्या खोर या ठिकाणी दिवसातून जवळपास २० ते २५ रुग्ण हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येत आहेत. परंतु अवघ्या उपलब्ध मेडिसिनवरच या रुग्णांना भागवले जात आहे.

डॉ. श्रद्धा शेंडगे (समुदाय आरोग्य अधिकारी)

खोर (ता. दौंड) येथील १ कोटी १३ लाख रुपयांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ही इमारत प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कधीही दरवाजा उघडला जात नसल्याने गवत उगवले आहे.

Web Title: Khor's primary health sub-center collapses, costs Rs 1 crore 13 lakh: Lack of health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.