खूशखबर : यंदाही देशात चांगला पाऊस, दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:19 AM2018-04-17T06:19:50+5:302018-04-17T06:19:50+5:30

यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षी देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस समाधाकारक होईल, अशी खुषखबर हवामान खात्याने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात मान्सूनचा सरासरी ८९ सेंमी पाऊस होतो.

 Khushakhar: It will not bring good rain and drought | खूशखबर : यंदाही देशात चांगला पाऊस, दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही

खूशखबर : यंदाही देशात चांगला पाऊस, दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही

Next

- हवामान खात्याचा अंदाज

पुणे : यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षी देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस समाधाकारक होईल, अशी खुषखबर हवामान खात्याने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात मान्सूनचा सरासरी ८९ सेंमी पाऊस होतो. यंदा त्याच्या ९७ टक्के पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला. गेल्या वर्षी सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला होता. अंदाजात ५ टक्क्यांची वाढ वा घट गृहित धरलेली असली तरी यंदा दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही, अशी हवामान खात्याला खात्री वाटते.
हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. केरळमध्ये पावसाचे आगमन नेमके केव्हा होईल व जुलै आणि आॅगस्ट या महत्त्वाच्या दोन महिन्यांत मान्सूनचा विस्तार देशभरात कसा व कुठपर्यंत होईल याचे अंदाज दुसºया टप्प्यात जाहीर केले जातील. स्कायमेट या खासगी संस्थेनेही काही दिवसांपूर्वी मान्सून १०० टक्के बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसाच अंदाज हवामान खात्यानेही वर्तविल्याने समाधानकार पावसाची आशा दुणावली आहे.
मान्सूनचा अंदाज सांख्यिकी मॉडेल व ‘डायनॅमिकल मॉडेल’ अशा दोन प्रकारे व्यक्त केला जातो. सोमवारी व्यक्त केलेला अंदाज दुसºया मॉडेलनुसार केलेला आहे.

- सरासरीच्या 97% पाऊस होणार
केरळमधील आगमनचा अंदाज मे महिन्याच्या मध्यात वर्तवणार. जुलै व आगस्टमधील पाऊस तसेच प्रत्येक हवमान विभागीत अपेक्षित पावसाचा अंदाज जूनमध्ये.

पुणे मॉडेलचा अंदाज ९९ टक्क्यांचा
पुण्यातील हवामान विभागात मान्सून मिशन अंतर्गत नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे़ त्यानुसार २०१७ पासून अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे़ यानुसार यंदा देशभरात दीर्घकालीन काळात ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात ५ टक्के वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे़

जून ते सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता; ५ श्रेणीत वर्गीकरण
पावसाचा अंदाज शक्यता
९० टक्क्यांपेक्षा कमी १४ टक्के
९० ते ९६ टक्के ३० टक्के
९६ ते १०४ ४२ टक्के
१०४ ते ११० १२ टक्के
११०%पेक्षा जास्त २ टक्के

यानुसार मान्सून कालावधीत पाऊस सामान्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असून कमी पावसाची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़

अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस
वर्ष स्कायमेट आयएमडी प्रत्यक्षात
2018 100% 97% -
2017 95% 96% 95%
2016 105% 106% 97%
2015 102% 93% 86%
2014 94% 95% 88%
2013 103% 98% 106%

 

Web Title:  Khushakhar: It will not bring good rain and drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस