बिनविरोध निवडणुकीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी खुटबाव ग्रामस्थांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:47+5:302020-12-31T04:11:47+5:30
यावेळी भाऊसाहेब ढमढेरे, शिवाजी थोरात, नानासाहेब थोरात, दशरथ थोरात, संजय थोरात, अरुण थोरात, जी.के. थोरात, सुदाम थोरात, नवनाथ थोरात ...
यावेळी भाऊसाहेब ढमढेरे, शिवाजी थोरात, नानासाहेब थोरात, दशरथ थोरात, संजय थोरात, अरुण थोरात, जी.के. थोरात, सुदाम थोरात, नवनाथ थोरात , दिगंबर थोरात,आर.डी.थोरात यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रभाग नुसार इच्छुकांची मते जाणून घेतली. १५ जागेसाठी एकूण ३५ जण इच्छुक असल्याची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे इच्छुकांमध्ये एकाही माजी पदाकाऱ्याचे नाव नव्हते. इच्छुकांमध्ये युवकांचा भरणा आधीच जास्त असल्यामुळे भविष्यामध्ये सर्वानुमते योग्य उमेदवाराला संधी देण्यात येईल. माघार घेतलेल्या उमेदवाराचा भविष्यामध्ये विचार करण्यात येईल. यावर्षी बिनविरोध निवडणुकीची पन्नाशी पूर्ण होत असल्याने सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
--
फोटो : ३०केडगाव खुटबाव ग्रामपंचायत
फोटो ओळी खुटबाव तालुका दौंड येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत बोलताना रमेश थोरात.