चिमुकलीचे अपहरण करणाऱ्यास अटक
By admin | Published: June 3, 2015 04:23 AM2015-06-03T04:23:20+5:302015-06-03T04:23:20+5:30
: भोर तालुक्यातील नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून चॉकलेट देतो, या बहाण्याने ३ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या दीपक राजकुमार
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून चॉकलेट देतो, या बहाण्याने ३ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या दीपक राजकुमार सोनी या नराधमास राजगड पोलिसांनी मुंबई येथील घाटकोपर येथे सापळा रचून पकडले आहे.
नसरापूर येथील स्वप्नलोक टाऊनशिपमधून दि.२८ रोजी बांधकामावर काम करणाऱ्या दीपक राजकुमार सोनी या बांधकाम मजुराने ओळखीच्या बहाण्याने सिंधू सुरेश चव्हाण हिला चॉकलेट देतो, असे सांगून मजुरांच्या
वसाहतीतीतून अपहरण केले होते. राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शाहुराजे साळवे यांनी सांगितले, की चिमुकल्या सिंधूचे अपहरण झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतातूर झाले होते.
राजगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला खबऱ्यांकडून
मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे हे आपल्या तपास पथकासह
मुंबईकडे रवाना झाले होते. तरीही दीपक सोनी हा साध्या वेशातील पोलिसांना चकवत होता, मात्र या पथकाने वेळेचे भान राखून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या आरोपीला सिंधूसह घाटकोपर येथे ताब्यात घेतले.
सहायक पोलीस
निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे
यांचेसह पोलीस नाईक विकास कांबळे, अजय शिंदे, दिनेश कोळेकर, संजय शेंडगे, जय पवार यांनी ही कामगिरी केली़
दीपक सोनी याला भोर
येथे न्यायालयात हजर केले
असता, त्याची १५ दिवसांकरिता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (वार्ताहर)