उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 08:26 PM2019-09-02T20:26:40+5:302019-09-02T20:28:02+5:30

टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले.

The kidnapping and beating of a young girl in a rage over a borrowing dispute | उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण 

उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण 

Next

हिंजवडी : टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास चांदणी चौक येथील बंद पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर बावधन येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी चौघां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कुणाल नारायण फाले (वय २५, रा. घोटावडे फाटा, ता. मुळशी) यांनी फिर्याद दाखल केली असून राम राजकुमार पाटील (वय २९, रा. भुकूम, ता. मुळशी), राहुल बालाजी बंडगर (वय २२, रा. भुकूम, ता. मुळशी), तौसीफ राजू इनामदार (वय २२, रा. लवळे, ता. मुळशी), प्रवीण भोसले (रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील चौथा आरोपी प्रवीण फरार असून इतरांना पोलिसांनी अटक केली आहे. 
फिर्यादी कुणाल फाले हे त्यांचा मित्र अक्षय प्रदीप यादव व त्यांची पत्नी हे चांदणी चौकाजवळील बंद पेट्रोल पंपासमोर बोलत उभे असताना त्यांचा मित्र अक्षय विक्रम वाल्हेकर (वय २३) हा त्यांच्या जवळ येऊन थांबला. अक्षय याची आरोपी राम पाटील यांच्या मेव्हण्याशी यापूर्वी टपरीच्या उधारीवरून झाले होते. त्या भांडणाच्या रागातून चारचाकीतून आलेल्या चौघांनी अक्षय वाल्हेकर यांना जबर मारहाण केली. तसेच जबरदस्तीने चारचाकीकडे ओढत नेत असताना फिर्यादीने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राम उर्फ अतुल पाटील याने बाजूला पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. तसेच अक्षय वाल्हेकर यास जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून नेऊन मारहाण केली. या घटनेत तीन आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The kidnapping and beating of a young girl in a rage over a borrowing dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.