पैशाच्या व्यवहारावरून मारहाण करत केले अपहरण; दोघांना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:10 PM2021-07-07T12:10:56+5:302021-07-07T12:11:18+5:30

सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी, पैशाची मागणी करण्याकारिता केले होते अपहरण

Kidnapping by beating over money transactions; The two were handcuffed in just two hours | पैशाच्या व्यवहारावरून मारहाण करत केले अपहरण; दोघांना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या

पैशाच्या व्यवहारावरून मारहाण करत केले अपहरण; दोघांना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपीना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी रचला सापळा

धायरी: पैशाच्या व्यवहारातून दोघांना मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी दोन आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. अविनाश पांडुरंग पाटील (वय: ३१) व उत्तम तुरंबेकर (वय :३१, रा. कोल्हापूर) अशी याप्रकरणी अटक असलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत निखिल उदय गुरव (वय: २६, रा. नऱ्हे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल गुरव हे प्रभात तोडकर सोबत नऱ्हे याठिकाणी राहावयास आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजता प्रभात तोडकर व त्याचा मित्र अजित राऊत यांना अविनाश पाटील व उत्तम तुरंबेकर यांनी आपसात संगनमत करून पैश्यांची मागणी करण्याकरिता जबरदस्तीने पळवून नेले. तसेच प्रभात तोडकर यांच्या डोक्यात बाटली मारून गंभीर जखमी केले. तर अजित राऊत यांना देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. 

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केली दोन तासांत  अटक

आरोपींनी पैश्यांची मागणी करून पैसे घेऊन दोघांना वाकड पुलाजवळ बोलावले. सिंहगड रस्ता पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला . मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्यांना पकडले. दोन्ही आरोपींना न्यायलायात हजर केले असता ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Web Title: Kidnapping by beating over money transactions; The two were handcuffed in just two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.