प्रेयसीच्या नवऱ्याचे अपहरण केले आणि पुढे घडले असे काही 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 07:51 PM2019-08-16T19:51:01+5:302019-08-16T19:54:54+5:30

गाडी भाड्याने घेऊन त्याने भाचा आणि त्याच्या पाच मित्रांसह अपहरण आणि खुनाची योजना आखली. त्यानुसार पहाटेच्यावेळी त्यांनी बहाणा करून फिर्यादीला भीमाशंकर रस्त्यावर फिरायला नेले.

The kidnapping of a beloved husband and something that happened next | प्रेयसीच्या नवऱ्याचे अपहरण केले आणि पुढे घडले असे काही 

प्रेयसीच्या नवऱ्याचे अपहरण केले आणि पुढे घडले असे काही 

Next

पुणे : प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी प्रेयसीच्या नवऱ्याने अपहरण करून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित तिघांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी सुदैवाने फिर्यादीने स्वतःची सुटका करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आरोपी शिवाजी बिचुकले ,अजय कुलाळ, अनिकेत गोरडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की,  मलठण ता. शिरूर येथील शिंदेवाडी मधील  संजय भिवा शिंदे याच्या पत्नीचे प्रेमसबंध असलेल्या बिचुकले या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. मात्र फिर्यादी त्यांचे चेंबूर येथील घर अतिक्रमणाच्या कक्षेत गेल्याने ते गावाकडे शिफ्ट झाले. या कारणामुळे पत्नी आणि प्रियकराच्या संबंधात अडथळा आल्यामुळे त्यांनी नवऱ्याचा काटा काढण्याचा निश्चय घेतला. त्यासाठी गाडी भाड्याने घेऊन त्याने भाचा आणि त्याच्या पाच मित्रांसह अपहरण आणि खुनाची योजना आखली. त्यानुसार पहाटेच्यावेळी त्यांनी बहाणा करून फिर्यादीला भीमाशंकर रस्त्यावर फिरायला नेले. तिथे गाडी थांबवून लघुशंकेचा बहाणा करून त्यांना खाली उतरवले. आणि योग्य वेळ साधून त्यांचा दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यावर फिर्यादीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत जवळच्या घरात जाऊन स्वतःची सुटका करून घेतली.

संबंधित ठिकाणाहून पोलिसांनी काथ्याची दोरी, लोखंडी चाकू, आरोपींचे दोन मोबाईल, मलठण येथून चोरीची पल्सर गाडी शिरूर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सांरगकर व पोलिस नाईक मुकुंद कुडेकर हे करत आहे.

Web Title: The kidnapping of a beloved husband and something that happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.