लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयिन मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:40 AM2018-12-29T00:40:21+5:302018-12-29T00:40:38+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाला मदत केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली

Kidnapping of minor girl by showing off the marriage | लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयिन मुलीचे अपहरण

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयिन मुलीचे अपहरण

googlenewsNext

लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाला मदत केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांनी अपहरण व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. आज मुलाच्या वडिलांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अल्पवयीन मुलाला आज बालन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलगी हडपसर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आॅक्टोबर २०१८ मध्ये या मुलाने पीडित मुलीला तू मला खूप आवडते, आपण लग्न करू, असे सांगितले होते. परंतु पीडित मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
२१ डिसेंबरला किरकोळ कारणावरून आई-वडील बोलतात, म्हणून पीडित मुलगी रागाने सकाळी आठ वाजता महाविद्यालयात गेली होती. तेथे जाऊन ती रडत बसली होती. त्यावेळी या मुलाने तिची विचारपूस केली. यावेळी मुलीने आई-वडील किरकोळ कारणावरून सतत बोलत असतात, म्हणून मी आत्महत्या करणार असल्याचे त्याला सांगितले. त्या मुलाने तिला समजावले व स्वत:च्या घरी नेले. त्यावेळी मुलाच्या आई-वडिलांनी आता तुझ्या घरी जाऊ नकोस, आपण लग्न करू, मग तू आमच्याबरोबर राहा, असे मुलीला सांगितले. मुलाच्या वडिलांनी त्या दोघांना दिंडोरी (जि. नाशिक) येथील एका नातेवाईकाच्या घरी नेऊन सोडले व वडील स्वत:च्या घरी निघून गेले. यानंतर या मुलाने आपले लग्न होणार आहे, असे सांगून पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.
पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले अधिक तपास करीत आहेत.

या पीडित मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीचा तपास केला असता ती पीडित मुलगी दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाली. २५ डिसेंबरला दोघांना प्रथम दिंडोरी पोलीस ठाण्यात व नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नंतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला पुण्यातील शासकीय रुग्णालयात नेले असता तिने वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. नंतर पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता तिने खरी हकिकत सांगितली. आपण आता लग्न करणार असल्याने आपल्या शारीरिक संबंधाबाबतीत कुणाला काहीही सांगू नकोस, असे या मुलाने सांगितल्यामुळे पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नकार दिला होता.

Web Title: Kidnapping of minor girl by showing off the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.