६० लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; भारती विद्यापीठ पोलिसांनी कट लावला उधळून
By विवेक भुसे | Published: February 19, 2024 03:05 PM2024-02-19T15:05:06+5:302024-02-19T16:30:17+5:30
मुलाची सुखरूप सुटका, मात्र आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू
धनकवडी : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीतून अपहरण केलेल्या बारा वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका करत भारती विद्यापीठ पोलिसांनीअपहरणाचा डाव उधळून लावला असून पोलीस अपहरण करणाऱ्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ६० लाखांची खंडणी मागितली असलेल्या तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची गंभीर ओळखून तात्काळ दखल घेत दोन पथके अपहरण करणाऱ्यांच्या मागावर रवाना केली. आरोपींचा माग काढत असताना मुलाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला होता. त्यामुळे पुर्ण काळाजी घेऊन तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी शोध घेत होते.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटेघर येथील जंगलांतून पुणे आणि सातारा पोलिसांच्या दोन पथकांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली असून आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात येत आहे.
याप्रकरणी मुलाचे चुलते अमित भिलारे (४२) यांनी तक्रार दाखल केली होती. भिलारे बंधुंचा दुधाचा व्यवसाय आहे.
भिलारे कुटूंब घरोघरी दुधाची डिलिव्हरी करतात. त्यांनी नुकतेच १७ गुंठे जागेचे प्लॉटींगचे काम सुरु केले होते. तर घराच्या बाजुला एका पत्रा शेडमध्ये राजेश शेलार आणि समीर शेलार यांना फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी जागा भाड्याने दिली आहे. अमोल यांचा मुलगा विराज हा सायकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हा नात्या तील एका मुलाने विराज हा राजेश शेलारच्या कारमध्ये बसून गेल्याचे सांगितले. कुटूंबाने राजेशला फोन लावला असता, तो बंद आढळला. दरम्यान राजेशच्या फोनवरु एका व्यक्तीचा फोन आला. त्याने राजेशचा खून केला असून तुमच्या मुलालाही मारुन टाकले जाईल. त्याचा जीव वाचवायचा असेल तर तातडीने ७० लाख रुपये घेऊन या अशी धमकी दिली. मात्र इतके पैसे नसल्याचे सांगितल्यावर समोरील व्यक्तींने शिवीगाळ करत फोन बंद केला. दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे कुटूंबा ने थोड्याफार पैशाची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. मात्र समोरील व्यक्तीने पुन्हा रागाने फोन ठेवला. दरम्यान पोलिसांनी मुलाचे आणि आरोपीचे लोकेशन शोधले. तेव्हा मुलगा तेथे बेशुध्दावस्थेत आढळला.