Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:51 PM2021-11-16T13:51:59+5:302021-11-16T13:52:30+5:30

खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन १ लाख रुपयांचा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kidnapping of youths for recovery of Rs 4 lakh 1 lakh was taken out by beating | Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले

Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले

Next

पुणे : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी ५ जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन १ लाख रुपयांचा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ५ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी बिबवेवाडीत राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी), अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० सप्टेबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी व कोंढव्यात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते. हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी फिर्याद यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नीकडून फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली.

फिर्यादी यांना कारमध्ये घालून त्यांचे अपहरण केले. गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले असा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of youths for recovery of Rs 4 lakh 1 lakh was taken out by beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.