भाजी आणण्यासाठी सासू गेली असताना जावयाने संधी साधत केले अल्पवयीन मेव्हुणीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 12:19 AM2020-10-23T00:19:12+5:302020-10-23T00:21:25+5:30

सिंहगड रोड पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

kidnaps of minor sister-in-law BY Son-in law | भाजी आणण्यासाठी सासू गेली असताना जावयाने संधी साधत केले अल्पवयीन मेव्हुणीचे अपहरण

भाजी आणण्यासाठी सासू गेली असताना जावयाने संधी साधत केले अल्पवयीन मेव्हुणीचे अपहरण

Next
ठळक मुद्देसासुने दिली तक्रार : हिंगणेमधील घटना 

पुणे : अल्पवयीन मुलीला घरात ठेवून पहाटे भाजी आणायला सासू गेली असताना जावयाने कुलूप काढून आपल्या मेव्हणीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंगणे खुर्द येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून ती पतीबरोबर दौंड तालुक्यातील केडगावला राहते. ही महिला आपल्या दोन लहान मुलींना घरात ठेवून बाहेरुन कुलूप लावून पहाटे भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा जावई आला व त्याने स्वत:जवळील चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केला. त्यांच्या दोन्ही मुलींना मारहाण करुन १७ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने स्वत:बरोबर घेऊन गेला. ही महिला घरी परत आल्यावर तिच्या १५ वर्षाच्या मुलीने ही हकीकत सांगितली. त्यानंतर या महिलेने जावई व मुलीचा शोध घेतला. पण ते मिळून न आल्याने तिने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर ही महिलाही घरातून निघून गेली आहे. त्यामुळे त्यांच्या जावयाचा नेमका पत्ता व अन्य माहिती पोलिसांना नसल्याने पोलिसांना आता फिर्यादीचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: kidnaps of minor sister-in-law BY Son-in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.