मुलांनो, व्हटॅमिन एफ घ्या आणि कायमचे निरोगी राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:30+5:302021-09-10T04:14:30+5:30
शरीराला जसे निरोगी राहण्यासाठी सर्व व्हिटॅमिनची गरज असते तसे मनाला निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन एफ ची गरज असते. हे व्हिटॅमिन ...
शरीराला जसे निरोगी राहण्यासाठी सर्व व्हिटॅमिनची गरज असते तसे मनाला निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन एफ ची गरज असते. हे व्हिटॅमिन म्हणजे "फ्रेंड्स". ह्या व्हिटॅमिन चे साईड इफेक्ट तसे काहीच नाहीत जरी जास्त झाले आयुष्यात तरी. झाला तर फायदाच होतो. पण पूर्वीचे आताचे लोक सांगतात तो नियम मात्र पाळला पाहिजे. संगत नेहमी चांगली असावी. तसे हे फ्रेंड्सवाले व्हिटॅमिन पण चांगले असावे.
तसा सर्वांना अनुभव असेलच ह्या व्हिटॅमिनचा. कारण मैत्री हे असे ठिकाण आहे. जिथे आपल्यातल्या सर्व विचारांना, तसेच मनाला विसावा मिळतो. मन मोकळे बोलता येते आणि मनाला प्रसन्न होऊन जाते. आणि मनाच्या कोपऱ्यात हक्काने राज्य करणारे नात हे मैत्रीचे असते.
मैत्री हे असे व्हिटॅमिन आहे जिथे काही न सांगता आनंद, दुःख, सर्व काही कळते तिथे शब्दांची गरज नसते. कितीही पैसा, सोने - नाणे असले तरी मैत्री सारखे व्हिटॅमिन विकत घेता येत नाही. ते तुम्ही आदराने, प्रेमानेच जवळ ठेवू शकता. त्यामुळे ह्याला आयुष्यभर सोबत ठेवा.
निरोगी मनाचे रहस्य म्हणजे व्हिटॅमिन एफ.
आले ना तुमच्या आयुष्यातले डोळ्यांसमोर व्हिटॅमिन एफ म्हणजेच सर्व मित्र- मैत्रीण .....
-------
अनुष्का तळेगावकर