पहाटेच्या डुलकीने केला घात, नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:10+5:302021-06-16T04:15:10+5:30
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे वडगाव-आंधळगाव रस्त्याजवळ असलेल्या वळण रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक कारचालक ...
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे वडगाव-आंधळगाव रस्त्याजवळ असलेल्या वळण रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक कारचालक आपल्या कारमधून मांडवगण फराटाच्या दिशेने प्रवास करीत होता. मुंबई येथून रात्रभर प्रवास केल्याने या ठिकाणी आल्यावर चालकाला डुलकी लागली होती. झोपेत असल्याने वडगाव रासाईकडे जाणारा वळण रस्ता त्यांच्या लक्षात आला नाही. यावेळी कार भरधाव वेगाने जात होती. अचानक वळण दिसल्याने चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु कार सरळ रस्त्याच्या खोदलेल्या चरातून पुढे जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर उभी राहिली. त्यामुळे चालकाचा जीव वाचला आहे. सदर कार क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
अपघात झालेले ठिकाण आंधळगाव, नागरगाव व वडगाव रासाई या गावांवरून येणाऱ्या रस्त्यांनी जोडलेले आहे. रस्ता चांगला असल्याने येथे येणारी-जाणारी वाहने वेगात असतात. त्यामुळे उभा तीन्ही रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची प्रवाशी मागणी करीत आहेत.