लिव्ह इन रिलेशनशिपमधील मुलीचा खून करणाऱ्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:03+5:302021-04-24T04:10:03+5:30
पुणे : एकमेकांवर प्रेम असल्याने दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, अल्पवयीन मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून ...
पुणे : एकमेकांवर प्रेम असल्याने दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, अल्पवयीन मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. २२ एप्रिल रोजी पेरणे फाटा परिसरात ही घटना घडली.
सागर वानखडे (वय २८) असे पोलीस कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. त्याने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा खून केला. याबाबत ३० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सागर याला न्यायालयात हजर केले असता, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यातील मयत मुलगी ही अल्पवयीन असून, त्याने तिला पळवून आणले आहे का?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, हा गुन्हा त्याने नेमका कोणत्या कारणासाठी केला?, यांसह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.