मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुलींना टाकले मारुन; आईचाही घेतला बळी, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

By विवेक भुसे | Published: July 19, 2023 11:38 AM2023-07-19T11:38:17+5:302023-07-19T11:38:41+5:30

मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार

Killing the twin girls out of lust for a son Mother was also victimized crime against four people including husband | मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुलींना टाकले मारुन; आईचाही घेतला बळी, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुलींना टाकले मारुन; आईचाही घेतला बळी, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

पुणे : मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी गर्भवती सूनेला मुले गोरे होण्याकरीता वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. तरीही जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून त्यांना मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. जुळ्या मुलींना मारल्यानंतर मुलीच्या आईला कारने पौड रोडला देऊन अपघात झाल्याचे भासविले. त्यात जखमी होऊन मुलीच्या आईचा मृत्यु झाला आहे.

अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय ५५), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी (वय २६, सर्व रा. शिवकृपा हरपळे वस्ती, फुरसुंगी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेबर २०१८ ते २६ नोव्हेबर २०१९ व ६ फेब्रुवारी २०२० रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगा च हवा या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरे होण्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या. उर्मिला हिने २६ नोव्हेबर २०१९ रोजी मुलींना दुध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी (वय ७ महिने) हिला बाहेरील दुध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशाच प्रकारे ६ फेबुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय ९ महिने) हि झोपली होती. अतुल सूर्यवंशी याने झोपलेले मुलीला बाहेरील दुध पाजून तिला जीवे ठार मारले.

मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वास नलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाला. अमोल सूर्यवंशी हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतरही त्याचे खरे कारण शवविच्छेदनात कसे येणार नाही, याची माहिती असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.

अतुल सूर्यवंशी याने उर्मिला ही आयटी कंपनीत कामाला असल्याचे दाखवून तिच्या नावाने ५० लाख, ५० लाख रुपयाचे दोन कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स काढले होते. त्यानंतर हिंजवडी येथील कंपनीत मुलाखतीला जायचे असे सांगून अतुल सूर्यवंशी हा फिर्यादी यांची बहिण उर्मिला सूर्यवंशी हिला घेऊन कारने पौडकडे गेला. त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे दर्शविले. या घटनेत उर्मिला सूर्यवंशी यांचा मृत्यु झाला. पौड पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याने याबाबतही फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्याची सुनावणी सध्या सुरु आहे.

Web Title: Killing the twin girls out of lust for a son Mother was also victimized crime against four people including husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.