रिकाम्या वेळेत पुस्तके वाचण्यासाठी साकारले बालग्रंथालय, पाचवीतील मुलांचा उपक्रम, नियोजन करून पुस्तकांची ठेवतात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:35+5:302021-05-31T04:08:35+5:30

मिहित मुन्शी या पाचवीतील मुलाने हा उपक्रम राबविला आहे. दोन-तीन मित्र एकत्र बसल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली आणि मिहितने ...

Kindergarten for reading books in leisure time, fifth grade children's activities, planning and keeping records of books | रिकाम्या वेळेत पुस्तके वाचण्यासाठी साकारले बालग्रंथालय, पाचवीतील मुलांचा उपक्रम, नियोजन करून पुस्तकांची ठेवतात नोंद

रिकाम्या वेळेत पुस्तके वाचण्यासाठी साकारले बालग्रंथालय, पाचवीतील मुलांचा उपक्रम, नियोजन करून पुस्तकांची ठेवतात नोंद

Next

मिहित मुन्शी या पाचवीतील मुलाने हा उपक्रम राबविला आहे. दोन-तीन मित्र एकत्र बसल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली आणि मिहितने ती सुरू केली. मिहितने एक बालग्रंथालय सुरू केले. त्यात सगळ्या मित्रांकडे असलेली पुस्तके रोज एकमेकांना बदलून देत आहेत. यासाठी एक चार्ट बनवला आहे. त्यात मित्राचे नाव व सही, पुस्तकाचे नाव आणि पुस्तक परत दिलेली तारीख असा चार्ट तयार केला. त्याला सत्यजित या मित्राची साथ लाभली.

सगळा उपक्रम फोनवरूनच ठरला. शिवाय वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर फोनवर चर्चाही करतात. यात विंपीकिड सीरिज, सेवन क्रिकेट सीरिज, वर्ल्ड आॅफ डेव्हिड विलियम्स सेट, विश्वकोश, टिंकल काॅमिक्स, अमर चित्रकथा, १०१ स्टोरीज, रस्किन बाँड स्टोरीज आणि अकबर बिरबल या पुस्तकांचा या ग्रंथालयात समावेश आहे. या उपक्रमासाठी आयुष, अमेय, अनेय, आरूष, विहान, अमोघ, आणि सर्वेश या बच्चे कंपनीने सहकार्य केले आहे. ही सर्व मुले तिसरे ते पाचवीतील आहेत.

--------------------

गेली दीड वर्ष झाले मुलं घरातच बसून आहेत. आई-बाबा खूप मस्ती करून देत नाहीत. मग बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत. बागेत खेळायला जाऊ शकत नाही. मग रिकामा वेळ कसा घालवायचा, तर त्यासाठी आम्ही पुस्तके वाचण्याचा उपक्रम सुरू केला.

- मिहित मुन्शी, इयत्ता पाचवी

-------------------

कोरोनाचे नियम पाळून पुस्तकांची देवाणघेवाण

ही पुस्तके देण्याची पद्धत म्हणजे मित्र दारातच उभा राहणार आणि तो सॅनिटायझर घेतल्यानंतर पुस्तकांची अदलाबदली करणार. त्यानंतर चार्टमध्ये पुस्तकाची नोंद करून घ्यायची. हे सर्व पालकांनी ठरवून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच केले जाते.

----------------

Web Title: Kindergarten for reading books in leisure time, fifth grade children's activities, planning and keeping records of books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.