वर्गखोलीअभावी बालवाडी रस्त्यावर

By Admin | Published: July 9, 2015 02:31 AM2015-07-09T02:31:37+5:302015-07-09T02:31:37+5:30

महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे.

On the kindergarten road due to class squares | वर्गखोलीअभावी बालवाडी रस्त्यावर

वर्गखोलीअभावी बालवाडी रस्त्यावर

googlenewsNext

पिंपळे गुरव : अंगणवाडी संदर्भातल्या अनेक समस्यांनी अंगणवाडीसेविका हैराण आहेत. त्यातच महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे. त्यामुळे चिमुकल्यांना रस्त्यावरच आपले ठाण मांडावे लागले आहे.
जुनी सांगवीतील अंगणवाडी क्र. ५२ ही जयमालानगर येथे भरते. एका जागामालकाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अवघ्या सातशे रुपये भाड्याने आपला गाळा दिला होता. मात्र, महिला व बालकल्याण विभागाला हे भाडेही चार महिन्यांपासून भरता आलेले नाही. त्यामुळे जागामालकाने गाळ्याला कुलूप लावले आणि पर्यायी जागा शोधण्यास अंगणवाडीसेविकेला सांगितले. मात्र, अनेक ठिकाणी शोधूनही जागा मिळत नाही. शासन मात्र सातशे ते साडेसातशे रुपये भाडे असलेली खोली भाड्याने घेण्यास सांगते. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. परंतु, नाईलाजास्तव तिथे शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने थकलेले भाडे त्वरित द्यावे, अशी मागणी होत आहे.
शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या गोष्टी असायला हव्यात. त्यांपैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडीसेविकांच्या निर्धारामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे. (वार्ताहर)

> परिसरात अनेक चांगल्या शाळा असूनही आम्ही आमची मुले इथे अंगणवाडीत घालतो. मात्र, शासनाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आमच्या पाल्यांवर होत आहे. केवळ कागद रंगवू नका. आमच्या पाल्यांना आवश्यक सोईसुविधा द्या. वर्गाअभावी आमच्या मुलांना रस्त्यावर बसावे लागत आहे. बौद्धिक विकास होईल, अशी कोणतीच गोष्ट येथे नाही. मात्र, याचे शासनाला काही देणे-घेणे नाही. या बालवाडीला लवकरात लवकर वर्ग मिळवून द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत.

>आज सर्वत्रच इंग्रजी शाळेमध्ये मुले घातली जातात. सांगवी परिसरातही तीच परिस्थिती आहे. शासनाने वयाची अट किमान ३ वर्षे केलेली असतानाही आज बहुतांश शाळांमध्ये २ वर्षे वयापासूनच प्रवेश दिले जात आहेत. अगदी गल्लोगल्ली या शाळा आहेत. त्यामुळे बालवाडीकडे मुलांना आकर्षित करणे खूपच अवघड आहे. अशा परिस्थितीतही सांगवीतील बालवाडीत आज जवळपास ३० ते ४० बालकांची उपस्थिती असते. एसटी कॉलनी व जयमालानगर या भागातली ही मुले असतात. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या बाबी असायला हव्यात. यापैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडी सेविकांच्या निधार्रामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या फक्त कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे.

Web Title: On the kindergarten road due to class squares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.