वर्तुळाचा राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:09+5:302021-09-10T04:17:09+5:30
साहित्य : फकी, विद्यार्थ्यांच्या संख्येइतकी बाटलीची बुचे किंवा गोट्या. काय साध्य होईल : चपळ व टार्गट विद्यार्थी लक्षात येतील. ...
साहित्य : फकी, विद्यार्थ्यांच्या संख्येइतकी बाटलीची बुचे
किंवा गोट्या.
काय साध्य होईल : चपळ व टार्गट विद्यार्थी लक्षात येतील.
सज्जतेसाठी घोषणा : शत्रूचा कसा वाजवतो बाजा, मीच होणार वर्तुळाचा राजा
खेळ खेळायचा कसा :
विद्यार्थी संख्येनुसार साधारण १५ ते २० फूट व्यासाचा गोल आखून
घ्यावा. त्यात दोन फूट व्यासाचा छोटा गोल आखावा. मोठ्या गोलवर मुले उभे
असतील तर छोट्या गोलात विद्यार्थी संख्येइतकी बाटलीची बुचे ठेवलेली
असतील.
शिक्षक विविध घोषणा देतील. त्यानुसार मुले गोलात घोषणा देत एकापाठोपाठ
एक याप्रमाणे फिरतील. शिक्षकांनी शिट्टी वाजवताच सर्व मुले आतील गोलात
असलेल्या वस्तू (बुचे/गोट्या) घेण्यासाठी धावतील. ज्यांना वस्तू मिळेल ते
परत गोलावर उभे राहतील. ज्यांना मिळणार नाही ते गोलाबाहेर बसतील.
पहिल्या वेळी सर्वांना वस्तू मिळतील; मात्र दुसऱ्या वेळेला एक एक वस्तू
शिक्षक काढतील. कधी कधी दोन काढल्या तरी चालतील. त्यानुसार मुले बाद
होतील. शेवटी एकच मुलगा उरेल. तो असेल वर्तुळाचा राजा.
सूचना : आतील छोटा गोल खूप छोटा होत असेल तर मोठा करावा.
जेणेकरुन खूप ओढा-ओढी होणार नाही. मुले व मुली असा एकत्र खेळ घेऊ नये.