जलद बुद्धिबळ स्पर्धेत हर्षित राजाला अजिंक्यपद

By admin | Published: April 25, 2017 04:24 AM2017-04-25T04:24:19+5:302017-04-25T04:24:19+5:30

एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ३२व्या सत्रात प्रतिभावान खेळाडू हर्षित राजा याने पटावरील वर्चस्व सिद्ध करून अजिंक्यपद पटकावले.

King of Harshit Raja in the Fast Chess Championship | जलद बुद्धिबळ स्पर्धेत हर्षित राजाला अजिंक्यपद

जलद बुद्धिबळ स्पर्धेत हर्षित राजाला अजिंक्यपद

Next

पुणे : एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ३२व्या सत्रात प्रतिभावान खेळाडू हर्षित राजा याने पटावरील वर्चस्व सिद्ध करून अजिंक्यपद पटकावले.
सिम्बायोसिसजवळील मंगलवाडी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ‘ग्रॅण्डमास्टर’चा नॉर्म पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेला इंटरनॅशनल मास्टर अभिमन्यू पुराणिक आणि हर्षित यांचे आठव्या फेरीअखेर प्रत्येकी ७.५ असे समान गुण होते. मात्र, टायब्रेकमध्ये हर्षितने माजी मारली. अखेरच्या फेरीत हर्षितने अनिरुद्ध देशपांडेवर, तर अभिमन्यूने निखिल दीक्षितवर मात केली. सोहम दातार आणि अविनाश सिंग यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.
या सत्रात हर्षितने अपराजित राहताना ६ विजय आणि ३ बरोबरी, अशी प्रभावी कामगिरी केली. अनिरुद्ध देशपांडे, आर्यन शाह आणि समीर इनामदार यांनी अनुक्रमे तिसरे, चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: King of Harshit Raja in the Fast Chess Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.