किंग्ज् स्पोर्ट्स, जीएसटी-कस्टमची विजयी सलामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:56+5:302021-03-30T04:08:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत किंग्ज् स्पोर्ट्स क्लब ...

Kings Sports, GST-Custom's winning opener! | किंग्ज् स्पोर्ट्स, जीएसटी-कस्टमची विजयी सलामी !

किंग्ज् स्पोर्ट्स, जीएसटी-कस्टमची विजयी सलामी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत किंग्ज् स्पोर्ट्स क्लब आणि जीएसटी अँड कस्टम संघांनी विजयी सलामी दिली.

मुंढव्यातील लिजंडस् स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या या स्पर्धेत किंग्ज् स्पोर्ट्स क्लब संघाने स्पायडर्स स्पोर्ट्स संघाचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. स्पायडर्स स्पोर्ट्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९.५ षटकात १० गडी गमावून १५३ धावा केल्या. किंग्ज् स्पोर्ट्स क्लबच्या अर्थव काळेने ३३ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या. अजित गव्हाणेने नाबाद ४४ धावा करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात धीरज फटांगरेच्या नाबाद ६९ धावांच्या स्फोटक खेळीमुळे जीएसटी अँड कस्टम संघाने पीआयओसी हरीकेन्स् संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पीआयओसी हरीकेन्सने २० षटकात ६ गडी गमावून १५२ धावा केल्या. जीएसटी अँड कस्टम संघाने हे आव्हान १४.५ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले.

सविस्तर निकाल :

स्पायडर्स स्पोर्ट्स: १९.५ षटकात १० गडी बाद १५३ धावा, राजवर्धन उंद्रे ४१, अनिष गायकवाड ३१, आनंद शहा २४, चंद्रकांत ठाकूर १६, पवन शहा २-२५, अ‍ॅलन रॉड्रीक्स् २-३० पराभूत वि. किंग्ज् स्पोर्टस् क्लब : १७.१ षटकात १ गडी बाद १५४ धावा, अर्थव काळे नाबाद ८८, अजित गव्हाणे नाबाद ४४, पवन शहा २१; सामनावीर :अर्थव काळे

पीआयओसी हरीकेन्स् : २० षटकात ६ गडी बाद १५२ धावा, ऋतुराज वीरकर नाबाद ५१, सुदीप पाठक नाबाद २५, आदर्श बोथरा २०, महेश पाटील १-२९ पराभूत वि. जीएसटी अँड कस्टम संघ : १४.५ षटकात ३ गडी बाद १५३ धावा, धीरज फटांगरे नाबाद ६९, शुभम नागवडे ३५, रोहन मारवाह २२, क्षितीज कबिर २-३३; सामनावीर : धीरज फटांगरे.

Web Title: Kings Sports, GST-Custom's winning opener!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.