Kirit Somaiya: पुणे महापालिकेत किरीट सोमय्या पुन्हा येणार; भाजप त्यांचं जोरदार स्वागत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:51 PM2022-02-08T19:51:22+5:302022-02-08T19:51:38+5:30
पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पण आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.
भाजपचे माजी खासदार किरीटजी सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये किरीटजी सोमय्या यांना दुखापत झाली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या अध्यक्षतेखाली पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी माझ्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, शहर प्रभारी धिरज घाटे, अतिरिक्त पोलीसआयुक्त रविंद्र शिसवे,सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, सुशील मेंगडे, संदीप खर्डेकर, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर,पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.