पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस; कोरोना नियमांचीही पायमल्ली, किरीट सोमय्यांचे जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:59 PM2022-02-11T16:59:24+5:302022-02-11T17:10:23+5:30
भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.
त्यानंतर किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातली. त्यामुळे प्रवेशद्वारावरून पोलिसाना हटण्यास भाग पाडले. महापालिका परिसरात अत्यंत गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच असंख्य नागरिकही उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यावेळी पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता आले नाही. सर्व कार्यकर्ते पायऱ्यांवर बसून आहेत. आता पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस, किरीट सोमय्यांचे जंगी स्वागत #Pune#BJPpic.twitter.com/BVJBmsEF6a
— Lokmat (@lokmat) February 11, 2022